पूजाचा खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 14:48 IST2016-09-04T09:15:14+5:302016-09-04T14:48:58+5:30

प्रत्येक व्यक्तीसाठी काही क्षण खास असतात. काहीजण हे क्षण शेअर करतात. तर काहीजण हे क्षण मनातच ठेवून त्यांचा आनंद ...

Special moment of worship | पूजाचा खास क्षण

पूजाचा खास क्षण

रत्येक व्यक्तीसाठी काही क्षण खास असतात. काहीजण हे क्षण शेअर करतात. तर काहीजण हे क्षण मनातच ठेवून त्यांचा आनंद लुटत असतात. असाच एक खास क्षण अभिनेत्री पूजा सांवतने हिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  पूजाने सोशलमिडीयावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत सुनिल बर्वे, मेधा मांजरेकर, सिध्दार्थ जाधव, आकाश ठोसर, सिध्दार्थ मांजरेकर हे कलाकार एकत्रित दिसत आहे. या फोटोवर तिने स्टेटस ही लिहिले आहे की, अशा या मोहक कलाकारांसोबत वेळ घालिवणे हा माझ्या आयुष्यातील एक खास क्षण आहे. तिच्या या खास क्षणाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना पूजा सांगते, हा फोटो महेश मांजरेकर यांच्या घरातील आहे. त्यांच्या घरी एक छोटासा कार्यक्रम होता. त्यावेळी आम्ही सर्व एकत्रित आलो होतो. या फोटोची एक गंमत सांगते, हा जो फोटो आहे. तो टाइमरवाला सेल्फी आहे. हा  सेल्फी मी, आकाश आणि सत्या टाइम सेट करून काढत होतो. त्यावेळी क्लिक होण्याच्या आतच मेधा, सुनिल, सिध्दार्थ हे या फोटोमध्ये पटकन अ‍ॅड झाले. विशेष म्हणजे हा फोटो इतका सुंदर येईन याची अपेक्षा ही केली नव्हती. पण हा सेल्फी एकदम झक्कास आहे. व या कलाकारांसोबत घालविला हा खास क्षण माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहीन.


 

Web Title: Special moment of worship