​ सुखविंदरचा भिकारीत आवाज घुमणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:24 IST2016-12-15T17:24:25+5:302016-12-15T17:24:25+5:30

सुखविंदर सिंग यांनी त्यांच्या गायकीच्या अलग शैलीने स्वत:चे वेगळे स्थान चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. अनेक दर्जेदार एका पेक्षा एक ...

The sound of Sukhwinder's ghost | ​ सुखविंदरचा भिकारीत आवाज घुमणार

​ सुखविंदरचा भिकारीत आवाज घुमणार

खविंदर सिंग यांनी त्यांच्या गायकीच्या अलग शैलीने स्वत:चे वेगळे स्थान चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. अनेक दर्जेदार एका पेक्षा एक सुपरहिट गाणी गायलेले सुखविंदर सिंग यांचा आवाज आता मराठी चित्रपटात देखील घुमणार आहे. सुखविंदर सिंग यांच्या मराठमोळ््या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच आपल्याला सुखविंदर यांचे गाणे गणेश आचार्य यांच्या पहिल्या मराठी चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. गणेश आचार्य प्रथमच भिकारी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात केवळ एकच गाणे आहे. हे गाणे सुखविंदर यांनी गावे अशी गणेश आचार्य यांची इच्छा होती. गणपती बाप्पाचा गजर करणारे देवा हो देवा असे त्या गाण्याचे बोल आहेत. तर हे गाणे संगीतकार मिलिंद वानखेडे यांनी संगीतबद्ध केले आहे. भिकारी या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अमिताभ बच्चन यांनी केला होता. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे समजतेय. स्वप्निल जोशी यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर नवोदित अभिनेत्री स्वप्निलसोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुखविंदर सिंग यांचा आवाज वेगळ््या ढंगात ऐकण्यासाठी सर्वजणच उत्सुक आहेत. भिकारी या चित्रपटामध्ये आई आणि मुलाचे भावनिक नाते उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एक संवेदनशील कथा घेऊन गणेश आचार्य मराठीत दिग्दर्शकीय पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. सुखविंदर यांचे या चित्रपटातील हे एकुलते एक गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय का हे तर आपल्याला लवकरच समजेल.

Web Title: The sound of Sukhwinder's ghost