​ सोनालीने दिल्या रिंकुला परिक्षेसाठी शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 13:46 IST2017-01-05T13:46:14+5:302017-01-05T13:46:14+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकु राजगुुरुला नुकत्याच सोशलसाईट्सवर शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकु सैराट या सिनेमाच्या याशानंतर ...

Sonali wishes for Rinkula test | ​ सोनालीने दिल्या रिंकुला परिक्षेसाठी शुभेच्छा

​ सोनालीने दिल्या रिंकुला परिक्षेसाठी शुभेच्छा

िनेत्री सोनाली कुलकर्णीने सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकु राजगुुरुला नुकत्याच सोशलसाईट्सवर शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकु सैराट या सिनेमाच्या याशानंतर रातोरात स्टार झाली. सर्वसामान्य प्रेक्षकच काय तर रिंकु मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची देखील फेव्हरेट बनली. आता रिंकुला सोनालीने तिच्या परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सैराट चित्रपटाचे रिंकुने आॅडिशन दिले तेव्हा ती सातवी इयत्तेत होती. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा रिंकु नववीमध्ये होती. सध्या ती दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा अभ्यास करीत आहे. त्यामुळेच की काय रिंकु आपल्याला जास्त कुठे पाहायला मिळत नाही. नुकतीच ती आमीर खानच्या पाणी फाऊंडेशच्या व्हीडीओमध्ये सैराट टिमसोबत आपल्याला पाहायला मिळाली होती. याच व्हीडीओमध्ये सोनाली देखील होती. यावेळी सोनालीने रिंकु सोबत एक झक्कास फोटो काढला आणि तिला दहावीच्या परिक्षेसाठी बेस्ट आॅफ लक देखील बोलले आहे. रिंकु जरी आता दहावीत असली तरी ती काही शाळेत जात नाही. आता तुम्ही म्हणाल की तिने काय शाळा सोडली का? तर तसे काहीच नाहीये. रिंकुने शाळा जरी सोडली असली तरी ती बाहेरुन बोर्डाची परिक्षा देणार आहे. एकदा का रिंकुची परिक्षा संपली की आपल्याला ही सैराट गर्ल पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसु शकते. सध्या तिच्या कन्नड सैराट या चित्रपटाची देखील बरीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील काही सीन आणि पोस्टर नुकतेच सोशलसाईट्सवर रिव्हील झाले आहे. या सैराटमध्ये रिंकु सोबत साऊथच्या एका बड्या व्हीलनचा मुलगा दिसणार आहे. त्यामुळे सध्या परिक्षेचा अभ्यास करणाºया आर्चीला तिचे चाहते नक्कीच सैराटमय शुभेच्छा देतील यात काही शंकाच नाही.

Web Title: Sonali wishes for Rinkula test