सोनालीने लुटला पावसाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 10:57 IST2016-05-07T05:19:24+5:302016-05-07T10:57:57+5:30

 विचारात पडला ना? इतका कडक उन्हाळा चालू आहे आणि ही सोनाली कुठे पावसाचा आनंद लुटत आहे. जास्त गोंधळून जाऊन ...

Sonali looted rain | सोनालीने लुटला पावसाचा आनंद

सोनालीने लुटला पावसाचा आनंद

 
िचारात पडला ना? इतका कडक उन्हाळा चालू आहे आणि ही सोनाली कुठे पावसाचा आनंद लुटत आहे. जास्त गोंधळून जाऊन नका अभिनेत्री सोनाली खरे ही सध्या न्यूयार्क या ठिकाणी पावसाचा मनसोक्तपणे आनंद लुटत आहे. सोनालीने चेकमेट, सावरखेड एक गाव या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच प्यार के दो नाम एक राधा, एक शाम या हिंदी मालिकेतून देखील तिने मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतदेखील आपले नाव बनविले आहे. नुकतेच या सुंदर अभिनेत्रीने न्युयार्क येथे पावसाचा आनंद लुटत असल्याचा फोटो सोशलमिडीयावर अपलोड केला आहे. या किल्कमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. न्युयार्क या सुंदर सिटीचे ओले रस्ते, त्या सिटीची श्रीमंती तिच्या या किलकमध्ये कैद झालेली दिसते. तसेच डोक्यावर स्टायलीश टोपी, मानेवर सोडलेले मोकळे केस यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. पण कदाचित तिला जखमेवर मीठ चोळत सुचवायचे असेल की,आपल्याकडे जरी कडक उन्हाळा चालू असला तरी मी मात्र न्युयार्कमध्ये पावसाचा आनंद घेत आहे आहे. 

Web Title: Sonali looted rain