सोनाली कुलकर्णीचा 'तमाशा लाईव्ह', व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:40 IST2022-05-03T14:24:44+5:302022-05-03T14:40:06+5:30

अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या तमाशा लाईव्हच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Sonali Kulkarni's marathi movie 'Tamasha Live' teaser out | सोनाली कुलकर्णीचा 'तमाशा लाईव्ह', व्हिडीओ होतोय व्हायरल

सोनाली कुलकर्णीचा 'तमाशा लाईव्ह', व्हिडीओ होतोय व्हायरल

संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटातील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये सिद्धार्थ म्हणतो बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार? हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना २४ जूनला मिळणार आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.  

  'तमाशा लाईव्ह'बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, '' 'तमाशा लाईव्ह'च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे. चित्रीकरणाआधी आमची अडीच महिने कार्यशाळा सुरु होती. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच या कलाकारांना व्यक्तिरेखेशी एकरूप होणे जरा कठीण जात होते. त्या व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय मिळत नसल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त होत होती. मात्र अडीच महिन्यांनी हे चित्र पूर्णपणे पालटले. मला आठवते, चित्रीकरण संपल्यानंतर एकदा एडिटला बसल्यावर मला सोनालीची एक लाईन सापडत नव्हती आणि ती त्यावेळी एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. मी तिला फोन केला आणि अल्पावधीतच तिने मला व्हॉट्सअपवर संपूर्ण सीन रेकॉर्ड करून पाठवला. एवढी ती त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झाली होती आणि तीच नाही तर चित्रपटातील प्रत्येक कलाकार अडीच महिन्यांनी आपापल्या व्यक्तिरेखेशी जोडले गेले होते.''  

Web Title: Sonali Kulkarni's marathi movie 'Tamasha Live' teaser out