साडीत सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला लागले चारचाँद, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 07:15 IST2019-12-04T07:15:00+5:302019-12-04T07:15:00+5:30

'दिल चाहता है' चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला.

SonalI kulkarni share her beautiful photo on instagram | साडीत सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला लागले चारचाँद, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

साडीत सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला लागले चारचाँद, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नुकताच सोनालीने पिंक रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सोनालीने सौंदर्य आणखी खुलून आले आहे.  सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.


सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.


सोनाली लवकरच 'पेंशन' सिनेमात दिसणार आहे. मराठी चित्रपट 'पेंशन' चे कथा-लेखन आणि दिग्दर्शन मराठी सिनेमाचे पुरस्कार विजेते पुंडलिक धूमिल यांनी केले आहे.या चित्रपटामध्ये त्यांनी एका महिलेची कथा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही महिला कशा प्रकारे फक्त पेंशनवर आपल्या लहान मुलांना कठीण परिस्थितीत वाढवते हे बघायला खूपच मजेदार असेल. या महिलेच्या भूमिकेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार आहे.

Web Title: SonalI kulkarni share her beautiful photo on instagram