​सोनाली कुलकर्णीच्या घरी आला 'बाप्पा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 04:45 AM2017-08-31T04:45:57+5:302017-08-31T10:15:57+5:30

सोनाली कुलकर्णीचा तुला कळणार नाही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच तिची जोडी सुबोध भावेसोबत झळकणार ...

Sonali Kulkarni gets home | ​सोनाली कुलकर्णीच्या घरी आला 'बाप्पा'

​सोनाली कुलकर्णीच्या घरी आला 'बाप्पा'

googlenewsNext
नाली कुलकर्णीचा तुला कळणार नाही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच तिची जोडी सुबोध भावेसोबत झळकणार आहे. हा चित्रपट ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सोनाली सध्या चांगलीच व्यग्र आहे. पण त्यातूनही वेळ काढून ती गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करत आहे.
पोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णीच्या पुण्याच्या घरी 'बाप्पा' विराजमान झाले आहेत. पुणेकर असलेल्या कुलकर्णी कुटुंबातील हा पिटुकला बाप्पा, गोंडस आणि गोजिरा आहे. आपल्या आगामी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत सोनालीने आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक पद्धतीनुसार घरच्या गणपतीचे स्वागत केले. निगडी येथील तिच्या निवासस्थानी १२ दिवस विराजमान असणाऱ्या या बाप्पाच्या सेवेत ती व्यग्र आहे. ‘आमच्या घरी गेल्या तीस वर्षांपासून गणपतीचे आगमन होते. आमच्या घरात नेहमीच शाडूची मूर्ती विराजमान होते. पर्यावरणपूरक प्रतिष्ठापना करण्यावर प्रत्येकांनी भर द्यायला हवा असे मला वाटते. माझ्या घरचा गणपती आम्ही महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या विसर्जन हौदमध्ये विसर्जित करतो’. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. गणेशोत्सवाच्या कालावधीत बाप्पा दरवर्षी मला भरभरून देतो. लवकरच 'तुला कळणार नाही' हा माझा सिनेमा प्रदर्शित होत आहे. बाप्पाच्या विसर्जनानंतर मी पुन्हा या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी स्वतःला झोकून देणार आहे. 'बाप्पाचा आशीर्वाद सर्व भक्तांवर असाच सदैव राहू दे' अशी प्रार्थना मी विघ्नहर्त्याकडे करते. 
राहुल आणि अंजली या रोमँटिक कपलची लग्नानंतरची स्टोरी सांगणारा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा नवरा-बायकोंमध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या कुरबुरीवर भाष्य करतो. प्रेमाचा गुलमोहोर लग्नानंतर कसा गळून पडतो, याचे वर्णन या सिनेमात करण्यात आले आहे.

Also Read : जाणून घ्या ​सुबोध भावेने कशी केली सोनाली कुलकर्णीची मदत

Web Title: Sonali Kulkarni gets home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.