सोनाली कुलकर्णी बनली शेफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 16:48 IST2017-04-24T11:18:57+5:302017-04-24T16:48:57+5:30
सोनाली कुलकर्णीने मराठी आणि हिंदी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिल चाहता है, मिशन काश्मीर या चित्रपटातील तिच्या ...
.jpg)
सोनाली कुलकर्णी बनली शेफ
स नाली कुलकर्णीने मराठी आणि हिंदी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिल चाहता है, मिशन काश्मीर या चित्रपटातील तिच्या भूमिका तर प्रचंड गाजल्या होत्या. मराठीत तिने पोस्टर बॉइज, अगं बाई अरेच्चा, डॉ. प्रकाश बाबा आमटे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटासाठी तर तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. आज मराठी, हिंदी इंडस्ट्रीत तिने चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. सोनालीचे अभिनयक्षेत्रात करियर चांगले सुरू असताना ती हे क्षेत्र सोडून शेफ का बनतेय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
सोनाली कुलकर्णी अभिनय सोडून ती नव्या व्यवसायाकडे वळली आहे असेच तुम्हाला वाटले असेल. पण असे काहीही नाही अभिनय हे कधीही सोनालीसाठी पहिले प्रेम आहे. पण त्याचसोबत ती आता एक शेफदेखील बनली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनाली तिच्या ट्विटरच्या अकाऊंटवर अनेक जेवण बनवतानाचे व्हिडिओ पोस्ट करत आहे आणि या पोस्टना तिच्या फॅन्सचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सध्या सगळीकडेच प्रचंड उन्हाळा वाढला आहे आणि त्यामुळे उन्हात थंड ज्यूसेस प्यावेत असे सगळ्यांना वाटते. हे थंड ज्यूसेस कशापद्धतीने बनवायचे हे ती तिच्या फॅन्सना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकवत आहे. त्यातील एक रेसिपी तर तिने तिच्या आईकडून शिकलेली लोकांसोबत शेअर केली आहे.
या सगळ्या रेसिपींचे चित्रीकरण हे सोनालीच्याच घरातील किचनमध्ये केले आहे असेच वाटत आहे. सोनाली या व्हिडिओत भाजी चिरण्यापासून ते ज्यूसचा ग्लास सजवण्यापर्यंत सगळे काही करताना आपल्याला दिसत आहे.