सोनाली का झाली डिझायनर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:45 IST2016-10-26T17:45:31+5:302016-10-26T17:45:31+5:30

          अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या चतुरस्त्र अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. सतत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ...

Sonali ki designer? | सोनाली का झाली डिझायनर ?

सोनाली का झाली डिझायनर ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
 
      अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या चतुरस्त्र अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. सतत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण सोनालीला पाहिले आहे. आता सोनाली पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. आता तुम्ही म्हणाल की सोनाली कोणत्या चित्रपटात आपल्याला नवीन भूमिकेत दिसणार आहे का? असा विचार जर तुमच्या मनात आला असेल तर तसे बिलकुलच काही नाहीये. सोनाली नव्या भूमिकेत आली म्हणजे ती ड्रेस डिझायनर झाली आहे. नुकतीच सोनालीने एक झक्कास साडी डिझाईन केली आहे. या साडीमध्ये ती फारच सुंदर दिसते आहे. स्वत: डिझाईन केलेल्या नेटेड साडीचा फोटो नुकताच सोनालीने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांकडून अनेक लाईक्स मिळत आहेत. सोनाली उत्तम अभिनेत्री आहेच परंतू ती चांगली डिझायनर देखील असल्याचे आता समोर आले आहे. सोनालीच्या या हिडन टॅलेंटचे तिचे चाहते नक्कीच कौतुक करतील. परंतु सोनालीने साडी डिझाईन जरी केली असेल तरी तिने करिअर सोडले नाही. सोनाली अभिनयासोबत तिचा हा ड्रेस डिझायनिंगचा छंद जोपासत आहे. सोनालीने जर चित्रपटांसाठी डिझायनर म्हणुन काम केले तर आश्चर्य वाटायला नको. सोनालीची आता एक डिझायनर म्हणून देखील नवीन ओळख व्हायला वेळ लागणार नाही. एखादया चित्रपटामध्ये सोनालीने डिझाईन केलेले कपडे कलाकारांच्या अंगावर प्रेक्षकांना दिसु शकतील. आता डिझायनर म्हणुन ती स्वत:चा वेगळा ठसा इंडस्ट्रीत उमटविणार का हे लवकरच समजेल. मात्र अभिनेत्री म्हणून तर सोनालीने चित्रपटसृष्टीत नाव कमावलेच आहे. तिला यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

Web Title: Sonali ki designer?