सोनाली खरेच्या मनमोहक अदा पाहून चाहते पडले तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 12:59 IST2021-03-01T12:56:18+5:302021-03-01T12:59:02+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली फॅन्सच्या संपर्कात असते.

Sonali khare shares her stunning pic on instagram | सोनाली खरेच्या मनमोहक अदा पाहून चाहते पडले तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

सोनाली खरेच्या मनमोहक अदा पाहून चाहते पडले तिच्या सौंदर्याच्या प्रेमात

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. सोनालीने इन्स्टाग्रामवर ट्रेडिशनल लूकमधला फोटो शेअर केला आहे. ज्यात सोनाली खूपच सुंदर दिसतेय. सोनालीच्या चाहत्यांनी ही तिच्या फोटोशूटला भरभरुन दाद दिली आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला.

मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे.बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

बिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ आसमाँ या मालिकेद्वारे केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Web Title: Sonali khare shares her stunning pic on instagram