मराठीतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला ग्लॅमरस फोटो, योगामुळे असते सोशल मीडियावर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:00 IST2020-05-07T07:00:00+5:302020-05-07T07:00:00+5:30

गॉर्जिअस, ब्युटिफुल अशा कमेंट्स त्या फोटोवर आल्या आहेत.

Sonali Khare her black and white photo gda | मराठीतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला ग्लॅमरस फोटो, योगामुळे असते सोशल मीडियावर चर्चेत

मराठीतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला ग्लॅमरस फोटो, योगामुळे असते सोशल मीडियावर चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. लॉकडाऊनच्या काळात अनेक  योगासन करतानाचे फोटो सोशल मीडियावर सोनाली शेअर करत असते. मात्र सोनालीने यावेळी योगासन करतानाचा फोटो शेअर न करता तिचा ब्लॅक अँड व्हाईट ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनाली खूपच बोल्ड दिसतेय. सोनालीच्या या फोटोला फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. गॉर्जिअस, ब्युटिफुल अशा कमेंट्स त्या फोटोवर आल्या आहेत.

सोनानी काही महिन्यांपूर्वी तिचे WOW नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती हेल्थ, वेलनेस व फिटनेसशी निगडीत सल्ले प्रेक्षकांना देत असते.

सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ती बाहुबली चित्रपटावर आधारीत वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. यात ती पारंपारिक वेशात दिसणार आहे.

Web Title: Sonali Khare her black and white photo gda