सोनाली खरेनं लाडकी मैत्रिण अमृता खानविलकरला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 15:38 IST2025-11-23T15:30:24+5:302025-11-23T15:38:05+5:30
आज २३ नोव्हेंबरला अमृता खानविलकरचा वाढदिवस असतो.

सोनाली खरेनं लाडकी मैत्रिण अमृता खानविलकरला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाली...
Amruta Khanvilkar Birthday : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमी चर्चेत असते. तिच्या डान्सची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. तिने वेगवेगळ्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज २३ नोव्हेंबरला अमृता खानविलकरचा वाढदिवस असतो. तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींकडून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव झालाय. या खास दिवशी तिच्या लाडक्या मैत्रिणीने म्हणजेच अभिनेत्री सोनाली खरेने अमृतासाठी खास पोस्ट केली आहे.
सोनालीने अमृताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने अमृताबरोबरचे फोटो शेअर करत लिहलं, "माझ्या भावनिक, प्रेमळ, ड्रामॅटिक आणि सुपर टॅलेंटेड मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अमृता तू खूप स्वप्न बघणारी आणि मनसोक्त आयुष्य जगणारी मुलगी आहेत, तू जेव्हा इतरांना माझ्याबद्दल ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे बाकीच्यांनी तिच्यापासून लांब राहा, असं म्हणतेस आणि खरं सांगू? मला ते प्रचंड आवडतं".
सोनाली पुढे म्हणाली, "आपल्या मैत्रींनी प्रत्येक कठीन टप्पा पार केलाय. कारण, ती खरी आहे आणि आजही इतकी वर्ष टिकून आहे. तुला यापुढेही खूप उत्तम भूमिका मिळो, तुझी प्रगती व्हावी, तुला मोठं यश मिळो, जशी वाइल्ड, लव्हिंग, ड्रामॅटिक, पझेसिव्ह आहेस तशीच राहा आणि आणि हो आयुष्यभर माझ्यासोबतच राहा". सोनालीच्या गोड पोस्टवर अमृताने कमेंट करत "आय लव्ह यू" असं लिहिलं.
अमृता व सोनाली या दोघी एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा एकमेकींबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात. या दोघी एकेमकांवर जीवापाड प्रेम करतात. एकमेकींना तितकंच महत्व देतात. या दोघींची ही मैत्री अनेकांना भावते. दोघी नेहमीच एकमेकींच्या कौटुंबिक कार्यक्रमातही आवर्जून हजेरी लावतात. तसेच प्रत्येक परिस्थितीत दोघी एकेमकांसोबत खंबीरपणे उभे राहत असल्याचंही अनेकवेळा समोर आलं आहे. विशेष म्हणजे या दोघेही मराठीतल एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.