Exclusive पावसाच्या आनंदात सोनालीचा डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 16:09 IST2016-07-08T10:39:25+5:302016-07-08T16:09:45+5:30

  प्रियांका लोंढे                           पावसाळ््यात बरसणाºया धुंद पावसात ...

Sonali dance in exquisite rainy season | Exclusive पावसाच्या आनंदात सोनालीचा डान्स

Exclusive पावसाच्या आनंदात सोनालीचा डान्स

 
m> प्रियांका लोंढे
           
              पावसाळ््यात बरसणाºया धुंद पावसात मस्त कुठेतरी फिरायला जावे असे तर प्रत्येकालाच वाटत असते. बाहेर सगळीकडे एकदमच रोमँटिक वातावरण झालेले असते अन अशा अ‍ॅटमॉस्पिअरमध्ये काहींना तर बेधुंद, मनसोक्त डान्स करण्याची देखील ईच्छा होत असते. आता पहा ना आपली अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी ही किती उत्तम डान्सर आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहितीये. तिच्या नृत्याची जादु तर सर्वांनीच अनुभवलीये. पण आता या अप्सरेला पुन्हा एकदा पावसात डान्स करण्याचा मोह झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की सोनाली पावसाचा आनंद घेत पावसात चिंब भिजली आहे का. तर असे काहीच नाही. एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यान बाहेर पाऊस पडत असताना सोनालीने आतमध्ये डान्स करण्याचा पुरेपुर आनंद घेतला आहे. पिंक कलरच्या सुंदर घागºयामध्ये ठुमके लावतानाचे सोनालीचे फोटो सोशल साईट्सवर वायरल झाले असुन विकेंड स्पेशल पिच्चर.. रेन मेक इट सो स्पेशल अशी कॅप्शन सोनालीने या फोटोला दिली आहे. या बद्दल सोनालीला विचारले असता तिने सांगितले की, मी ऐका चित्रटाच्या शुटिंग मध्ये असताना हा फोटो काढला. बाहेर मस्तपैकी पाऊस पडत होता अन मी आतमध्ये डान्स करत होते.  सोनाली कोणत्या चित्रपटाच्या सेटवर नाचायचा आनंद घेत होेती हे तर तिने काही सांगितले नाही पण आपल्याला काही दिवसातच तिच्या या आगामी सिनेमाविषयी आपल्याला समजेल तोवर सोनालीचा हा डान्स एन्जॉय करुयात.

Web Title: Sonali dance in exquisite rainy season