सोनालीचा हा फोटो एकदा पाहाच, फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 10:00 IST2019-10-26T10:00:00+5:302019-10-26T10:00:00+5:30

सोनालीने इन्स्टाग्रामवर एक साडीतला फोटो शेअर केला आहे.

Sonalee kulkarni looks beautiful in saree photo | सोनालीचा हा फोटो एकदा पाहाच, फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल तिच्या प्रेमात

सोनालीचा हा फोटो एकदा पाहाच, फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल तिच्या प्रेमात

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे. ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते.

त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. सोनालीने इन्स्टाग्रामवर एक साडीतला फोटो शेअर केला आहे. साडीने तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. निळ्या रंगाच्या साडीत सोनाली खूपच सुंदर दिसतेय. 


सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते.


या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. नुकताच तिचा हिरकणी सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. या सिनेमात तिने हिरकणीची भूमिका साकारली आहे. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. 

Web Title: Sonalee kulkarni looks beautiful in saree photo