मॉरिशयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 06:00 IST2019-08-21T06:00:00+5:302019-08-21T06:00:00+5:30

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

Sonalee kulkarni enjoying vacation in mauritius | मॉरिशयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती ?

मॉरिशयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती ?

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. 


सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

सध्या सोनाली मॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. तिथले फोटो ती फॅन्ससोबत शेअर करत असते. नुकताच सोनालीने इन्स्टाग्रामवर मॉरिशीयसमधला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोनालीने समुद्राच्या किनाऱ्यावर काढला आहे. सोनालीच्या फॅन्सनासुद्धा तिचा हा अंदाज चांगलाच भावला आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलायं. 


सोनालीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

Web Title: Sonalee kulkarni enjoying vacation in mauritius