ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 09:06 IST2024-06-09T09:05:21+5:302024-06-09T09:06:01+5:30

ड्रेसची लुंगी करून श्रीवल्लीच्या गाण्यावर थिकरली अप्सरा, 'अंगारों सा'वर सोनालीने केला भन्नाट डान्स

sonalee kulkarni dance on angaro sa song pushpa 2 video goes viral | ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या दाक्षिणात्य सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'मधील 'अंगारों सा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गाणं प्रदर्शित होताच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. आता मराठी सिनेसृष्टीची अप्सरा असलेल्या सोनाली कुलकर्णीलाही अंगारो सा गाण्याची भुरळ पडली आहे. 

सोनालीने 'अंगारों सा' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनाली पुष्पा आणि श्रीवल्लीच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सोनालीने या गाण्याच्या हुक स्टेप्सही केल्या आहेत. पण, खरं तर या व्हिडिओतील सोनालीच्या हटके स्टाइलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनालीने निळ्या रंगाचा हाय स्लीट ड्रेस घातला आहे. व्हिडिओत या ड्रेसची लुंगी करून सोनाली डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहतेदेखील थक्क झाले आहेत. सोनालीची हटके स्टाइल चाहत्यांना भावली आहे. 

सोनालीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "आमचा सामे" असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. "तु्म्ही काही केलं तरी भारी वाटतं", "साऊथ-वेस्टर्न कॉम्बो", "या लुंगीने मनं जिंकली", "हे फ्युजन भारी होतं", "अखिल भारतीय अण्णाची लुंगी गँगच्या अध्यक्ष सोनाली अण्णा", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

२०२१ साली 'पुष्पा' हा दाक्षिणात्य सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. पुष्पाची स्टाइल आणि त्याचे डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  आता या सिनेमाचा स्वीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ ऑगस्टला 'पुष्पा २' प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: sonalee kulkarni dance on angaro sa song pushpa 2 video goes viral