सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर, लाडक्या भावाचं निधन; भावुक होत म्हणाली- "हे जग..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 09:46 IST2026-02-24T09:45:49+5:302026-02-24T09:46:32+5:30

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनालीच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे.

sonalee kulkarni cousin brother death actress shared emotional post | सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर, लाडक्या भावाचं निधन; भावुक होत म्हणाली- "हे जग..."

सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर, लाडक्या भावाचं निधन; भावुक होत म्हणाली- "हे जग..."

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनालीच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे. सोनालीचा चुलत भाऊ अनिरुद्धचं निधन झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. भावाच्या आठवणीत सोनाली भावुक झाली आहे. 

सोनालीने इन्स्टाग्रामवरुन भावासोबतचे आठवणीतले खास क्षण शेअर केले आहेत. पोस्टमधून सोनालीने भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ती म्हणते, "आमचा अन्नूमा... हे जग सोडून तू एका चांगल्या ठिकाणी निघून गेलास. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तिकडे वेदनारहित नवीन आयुष्य मिळो. अध्यात्मिक, निरागस आणि जीव लावणारा असा मला माहीत असलेला सर्वात निर्मळ मनाचा व्यक्ती तू होतास. तुझं प्रत्येकासोबत छान नातं होतं. सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम केलंस. सगळी गाणी तुला माहीत होती. तबला अगदी छान वाजवायचास...आणि तुझ्या हातचा चहा... तू जसा होतास तसाच राहिलास आणि सगळ्यांना प्रेम दिलंस. तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू. ओम शांती". 


सोनालीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अनेकांनी सोनाली आणि तिच्या कुटुंबीया या धक्क्यातून सावरण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना केली आहे. सोनालीच्या भावाच्या निधनावर श्रद्धांजली अर्पण करत चाहत्यांनी तिच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

Web Title : सोनाली कुलकर्णी पर दुखों का पहाड़, भाई का निधन, भावुक पोस्ट।

Web Summary : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी के चचेरे भाई अनिरुद्ध का निधन हो गया। उन्होंने एक भावुक इंस्टाग्राम पोस्ट साझा करते हुए अपना दुख व्यक्त किया और उन्हें एक शुद्ध आत्मा के रूप में याद किया जो बिना शर्त प्यार करता था और संगीत और चाय बनाने में प्रतिभाशाली था। प्रशंसकों ने संवेदना व्यक्त की।

Web Title : Sonalee Kulkarni bereaved; brother passes away, actress shares emotional post.

Web Summary : Actress Sonalee Kulkarni's cousin brother, Aniruddha, passed away. She shared a heartfelt Instagram post, expressing her grief and remembering him as a pure soul who loved unconditionally and was talented in music and making tea. Fans offered condolences.