आकर्षक साडीमध्ये सोनालीचं सौंदर्य गेले खुलून, पाहा तिचे Latest Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:58 IST2021-06-24T16:57:45+5:302021-06-24T16:58:09+5:30
सोनाली कुलकर्णी प्रमाणेच कुणालला देखील विविध स्थळांना भेट द्यायला आवडते. विविध ठिकाणी भटकंती करायला आवडते. दोघांचेही सारखीच आवडी- निवडी असल्याचे सोनालीच्या या फोटोवरुन स्पष्ट होते.

आकर्षक साडीमध्ये सोनालीचं सौंदर्य गेले खुलून, पाहा तिचे Latest Photo
रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. नुकतंच लग्नबंधनात अडकलेली सोनाली सध्या तिचे हनीमून एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर तिच्या या खास क्षणाचे फोटोही तिने शेअर केले होते. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी नेहमीप्रमाणे प्रचंड पसंती दिली होती. पुन्हा एकदा सोनालीने तिचे नवीन फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. यावेळी मात्र कुठे भटकंती करताना दिसत नाही तर लग्नानंतर सोनालीची ही पहिलीच वटपौर्णिमा, पण परदेशात असल्यामुळे तिला हा सण साजरा करता आला नाही.
वटपौर्णिमेचे निमित्त साधत सोनालीने लाल रंगाची साडी परिधान केली असून कपाळावर टीकली असा साजश्रृंगार करत परदेशातही अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.पारंपरिक अंदाजामध्ये सोनाली आणखीनच सुंदर दिसत आहे. सोनालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अतिशय मनमौजी अशी सोनाली आहे. तिच्यापाठोपाठ पती कुणालही मनमौजी आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते. दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात. सोनाली सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असते.नेहमीच त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देत असते.
सोनालीप्रमाणेच कुणालला देखील विविध स्थळांना भेट द्यायला आवडते. विविध ठिकाणी भटकंती करायला आवडते. दोघांचेही सारखीच आवडी- निवडी असल्याचे सोनालीच्या या फोटोवरुन स्पष्ट होते.तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. तसेच काही व्हिडीओही शेअर केले आहेत. सोनाली निवांत क्षण एन्जॉय करताना दिसते. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी झोपाळ्याचा आनंदही घेताना ती दिसत आहे.