म्हणून अमृता खानविलकर झळकली नाही मराठी सिनेमात, जाणून घ्या काय आहे ते कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 11:12 IST2018-05-01T05:32:09+5:302018-05-01T11:12:57+5:30

म्हणून अमृता खानविलकर झळकली नाही मराठी सिनेमात, जाणून घ्या काय आहे ते कारण ?   वाजले की बारा म्हणत ...

So Amrita Khanvilkar did not get caught in Marathi cinema, know what is the reason? | म्हणून अमृता खानविलकर झळकली नाही मराठी सिनेमात, जाणून घ्या काय आहे ते कारण ?

म्हणून अमृता खानविलकर झळकली नाही मराठी सिनेमात, जाणून घ्या काय आहे ते कारण ?

हणून अमृता खानविलकर झळकली नाही मराठी सिनेमात, जाणून घ्या काय आहे ते कारण ?
 
वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. मालिका, डान्स रियालिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने काम केले आहे. गोलमाल, साडेमाडे तीन, नटरंग, झकास, धुसर, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे, बाजी अशा मराठी सिनेमात अमृताने काम केले आहे. मात्र मराठी सिनेमात अमृताचे मन फारसं रमले नसल्याचे बोललं जाते. नच बलिये या डान्स रियालिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर ती हिंदीतच जास्त रमली. विविध हिंदी डान्स रियालिटी शो होस्ट करण्यासह हिंदी सिनेमातही अमृता तिच्या अभिनयाची छाप पाडते आहे. मात्र या कालावधीत तिने कोणत्याही मराठी सिनेमात काम केले नाही. त्यामुळे अमृताने मराठी सिनेमाकडे पाठ फिरवली, तिला मराठी सिनेमात फारसा रस नाही अशा विविध चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र या सगळ्यांबाबत आता खुद्द अमृताने खुलासा केला आहे. मराठी सिनेमात ती इतके दिवस का झळकली नाही याबाबत तिने स्वतःहून स्पष्टीकरण दिले आहे. मराठी सिनेमात आपल्या वाट्याला येणा-या भूमिका त्याच त्याच प्रकारच्या होत्या. तशा भूमिका साकारण्यात आपल्याला रस नव्हता. कारण मराठीत आपल्या वाट्याला साचेबंध भूमिकाच येत होत्या. मराठीत बहुतांशी ग्लॅमरस भूमिका आपल्या वाट्याला आल्याचे तिने म्हटले. त्यामुळे एखादी महत्त्वाची आणि वेगळी भूमिका तसंच सिनेमात काम करायचे होते असं तिने स्पष्ट केले आहे. त्यातच सध्या अमृता हिंदी सिनेमात बिझी झाली आहे. सद्यस्थितीत हिंदी सिनेमांवर लक्ष केंद्रीत करायचे असल्याने मराठीत काम केले नसल्याचे अमृताने स्पष्ट केले आहे. राझी या सिनेमानंतर अमृता लवकरच सत्यमेव जयते या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अमृतासह जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात ती मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत अमृता सध्या उत्सुक आहे. याच कारणांमुळे ती गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमात झळकलेली नाही.  

Web Title: So Amrita Khanvilkar did not get caught in Marathi cinema, know what is the reason?