स्मिताचा हॉट आणि बोल्ड फोटो पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 12:12 IST2019-09-09T11:36:59+5:302019-09-09T12:12:06+5:30

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

Smita gondkar share her photo on social media | स्मिताचा हॉट आणि बोल्ड फोटो पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड

स्मिताचा हॉट आणि बोल्ड फोटो पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.


सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. स्मिताने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. स्मिताचा हा फोटो तिच्या फॅन्सना देखील भावला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


स्मिता गोंदकरने काही दिवसांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हॉलिवूडमध्ये काम करायचे असल्याचे सांगितले व पुढे म्हणाली की,' कलाकारांनी कधीच स्वतःला सीमित ठेवले नाही पाहिजे. 


कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार आहे. 

Web Title: Smita gondkar share her photo on social media