‘मुंबई-पुणे’ च्या प्रवासाला ६ वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 12:57 IST2016-06-11T07:27:09+5:302016-06-11T12:57:09+5:30

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार प्रेक्षकांचे सर्वात लाडके आणि खास आहेत. स्वप्नील जोशी आणि मुक्ता ...

Six years completed on 'Mumbai-Pune' journey | ‘मुंबई-पुणे’ च्या प्रवासाला ६ वर्ष पूर्ण

‘मुंबई-पुणे’ च्या प्रवासाला ६ वर्ष पूर्ण

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार प्रेक्षकांचे सर्वात लाडके आणि खास आहेत. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी सर्वांनाच आवडते.

'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटातून सतीश राजवाडेंनी स्वप्नील आणि मुक्ताची जोडी तयार केली. त्यानंतर मात्र प्रेक्षकांना ती जोडी फारच आवडली. मुंबई (मुक्ता) आणि पुणे (स्वप्नील) यांची प्रेमकथा 'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटात दाखवली आहे.

                                            

'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तरुणाईला मराठी सिनेमाच्या प्रेमात पाडण्याचं काम 'मुंबई-पुणे-मुंबई' ने केलं. 'मुंबई-पुणे-मुंबई' नंतर सतिश राजवाडेंनी 'मुंबई-पुणे-मुंबई २' बनवला आणि या चित्रपटावर देखील प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले. या चित्रपटातील वेगवेगळ्या गोष्टी, पात्रांचा अभिनय सुंदर पध्दतीने उलगडण्यात आले.

                                        

११ जून २०१० रोजी प्रदर्शित झालेला 'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटाला आज ६ वर्षे पूर्ण झाली. प्रेमाची भाषा, भावना समजणे या गोष्टींमुळे 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट नेहमी लक्षात राहणार आहे. तसेच मुंबई आणि पुणे यांच्यामधील एटिट्युड हा प्रेक्षकांनी नक्कीच एन्जॉय केला असणार. आज ६ वर्षे पूर्ण झाली, तरी या चित्रपटाती गाणी, स्वप्नील-मुक्ताची एंट्री, त्यांचे संवाद, त्यांचा राग-रुसवा आणि तो अनोखा शेवट अजूनही स्मरणात आहे आणि राहणार.

Web Title: Six years completed on 'Mumbai-Pune' journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.