​सैराटची रेकॉर्डब्रेक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 18:33 IST2016-05-04T13:03:15+5:302016-05-04T18:33:15+5:30

           सैराट हा सिनेमा प्रदर्शनापुर्वीच फार चर्चेत होता.  चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांची झिंग प्रेक्षकांवर चढल्यामुळे ...

Sirat's recordbreaking earnings | ​सैराटची रेकॉर्डब्रेक कमाई

​सैराटची रेकॉर्डब्रेक कमाई


/>           सैराट हा सिनेमा प्रदर्शनापुर्वीच फार चर्चेत होता.  चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांची झिंग प्रेक्षकांवर चढल्यामुळे सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांनी अ‍ॅडव्हांन्स बुकिंगसाठी रांगा लावल्या होत्या. तीन दिवसांपुर्वीच चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले असुन आठवडाभराची तिकीटे बुक झाली होती. ही परिस्थीती फक्त पुणे-मुंबई पुरतीच मयर्दित नव्हती तर राज्यभरात सैराटला हाच रिसपॉन्स मिळत होता. अगदी खेड्यापाड्यात कधी सिनेमागृहात न गेलेला माणुसही आज सैराट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर जात आहे. सेराटचे पहिल्या दिवशीच जबरदस्त ओपनिंग मिळाले अन या सिनेमाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सैराट महाराष्ट्रामध्ये ९८० ते १२०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता.  पहिल्याच दिवशी या सिनेमाने ४.२३ करोड तर दुसºया दिवशी ५.१० करोड अन तिसºया दिवशी ६.५० करोड व चौथ्या दिवशी ३ करोड असे तीन ते चार दिवसांचेच कलेक्शन जवळपास १२ ते १५ करोडपर्यंत जाणारे आहे. सैराटची ही घोडदौड वाटचाल पाहता आतापर्यंतचे मराठी इंडस्ट्रीतील सर्र्व रेकॉर्डब्रेक होण्याची शक्यता आहे. तरुणांवर सैराटची झिंग एवढी चढली आहे की थिएटरमध्ये पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहिला जात आहे. 

Web Title: Sirat's recordbreaking earnings