गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं झालं बारसं, फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 13:44 IST2021-08-19T13:43:47+5:302021-08-19T13:44:10+5:30

गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचे बारसे नुकतेच पार पडले आहे.

Singer Sawani Ravindra's daughters name ceremony, shared the photo | गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं झालं बारसं, फोटो केले शेअर

गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं झालं बारसं, फोटो केले शेअर

आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्रला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. हे तिने खुद्द सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते. तसेच तिने डोहाळे जेवणाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. दरम्यान आता सावनी रविंद्रच्या लेकीचे बारसे नुकतेच पार पडले आहे. तिने लेकीचे नाव शार्वी ठेवले आहे. या बारशाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात नुकतेच लेकीचे आगमन झाले आहे.आता या बाळाचे बारसे पार पडले आहे. तिने या बारशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, आजपासून आमच्या बाळाचं नाव ,"शार्वी" (पार्वती देवी आणि दुर्गा देवीचे हे नाव आहे. तसंच या नावाचा अजून एक अर्थ म्हणजे दिव्य - दैवी ) आमच्या बाळाच्या पाठिशी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव राहू देत.

प्रेग्नेंट असल्याची बातमी देताना सावनीने सांगितले होते की,' माझे बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझे बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझिक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केले आहेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली आहेत. तर काही गाणी लवकरच रिलीज होणार आहेत.

मला खूप अभिमान आहे की माझ्या होणाऱ्या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारच उत्सुक आहे.' 

Web Title: Singer Sawani Ravindra's daughters name ceremony, shared the photo