गायक आदर्श शिंदेची पत्नीही आहे गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी खास माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:43 IST2021-10-11T17:17:37+5:302021-10-11T17:43:26+5:30

''देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही''... या गाण्याने आदर्शला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली.

Singer Adarsh Shinde's wife Is Also Well-known Singer, Know Unknown Facts About Her | गायक आदर्श शिंदेची पत्नीही आहे गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी खास माहिती

गायक आदर्श शिंदेची पत्नीही आहे गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी खास माहिती

मराठीतील एक दमदार आवाज अशी ओळख असलेला आदर्श शिंदेचा आज प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.आदर्श शिंदेला लहानपणापासून वडील आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. वयाच्या 12व्या वर्षापासूनच आदर्शने स्टेज शोदरम्यान गायनास सुरुवात केली होती.


''देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही''... या गाण्याने आदर्शला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. आदर्शही इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर चाहत्यांसह संवाद साधत असतो. नवीन नवीन अपडेट चाहत्यांसह शेअर करत असतो. त्यांचे खास फोटो तो शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडियापेजवर नजर टाकली तर तुम्हाला त्याच्या पत्नीसह त्याने घालवलेले खास क्षणांचेही फोटो पाहायला मिळतील.


नेहा लेले असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मुळात दोघांचेही लव्ह मॅरेज आहे.एकमेकांच्या कुटुंबाच्या सहमतीने त्यानी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. आदर्श शिंदेने मे 2015 साली नेहा लेलेसोबत थाटामाटात लग्न केले. नेहा आणि आदर्शच्या या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी हजर होती.

यात स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, रवी जाधव यांसारखे कलाकार उपस्थित होते. या दोघांना एक मुलगीदेखील आहे. अंतरा शिंदे असे तिचे नाव आहे. त्यांच्या लग्नाचे कधीही समोर न आलेले आणि फारसे कुणीही न पाहिलेले फोटो समोर आलेत. 

 

या फोटोंमध्ये आदर्श आणि नेहा मेड फॉर इच अदर कपल असल्याचे पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मीचे सोबती बनण्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.  एक गोड दाम्पत्य म्हणून आदर्श आणि नेहाला ओळखलं जातं. 


नेहाही दिसायला खूप सुंदर आहे. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते. नेहमीच आपल्या स्टाइल आणि फॅशनमुळे ती नेटीझन्सचे लक्ष वेधून घेते. शेअर केलेल्या फोटोंमध्ये नेहाचा गॉर्जियस लूक पाहायला मिळतो.
 

Web Title: Singer Adarsh Shinde's wife Is Also Well-known Singer, Know Unknown Facts About Her