/> मराठी चित्रपटसृष्टीतील हॅन्डसम हंक, चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर तळयाकाठी मग्न झाला आहे असे सांगितले तर आश्चर्य वाटुन घेऊ नका. सिद्धार्थला नक्की काय झालेय कि तो तळयाकाठी गेलाय असा प्रश्न तर त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. परंतू सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी एक गुड न्युज आहे, सिद्धार्थ तळयाकाठी गेलाय ते एका नाटकासाठी. सिद्धार्थ चांदेकरचे पहिले व्यावसायिक नाटक मग्न तळयाकाठी लवकरच रंगमंच्यावर येत असल्याचे त्याने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पहिलेच नाटक असल्याने सिद्धार्थ जाम एक्सायटेड आहे. तो म्हणतोय, माझी नेहमीच नाटकात काम करण्याची ईच्छा होती. नाटकातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळते. मग्न तळयाकाठी हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी यांचे असुन सध्या आमची जोरदार तयारी सुरु आहे. चंद्रकांत कुलकर्णींची खासियत म्हणजे ते वाचनावर जास्त जोर देतात. तुम्ही काय वाचताय त्याचा अर्थ समजुन घ्या असे सांगणारे ते दिग्दर्शक आहेत. यामध्ये माझी अभय नावाची भुमिका आहे तर चिन्मय मांडलेकर देखील परागच्या भुमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळेल. वाडा चिरेबंदी या गाजलेल्या नाटकाचा पुढील भाग म्हणजे मग्न तळयाकाठी
आणि त्यासाठी मला चंद्रकांत कुलकर्णी यांनी विचारणा केली व यामध्ये मला अनेक दिग्गज कलाकारांसमवेत काम करायला मिळणार असल्याने मी जास्त खुष आहे. सिद्धार्थच्या या पहिल्याच व्यावसायिक नाटकासाठी त्याला सीएनएक्स टिम कडुन खुप साºया शुभेच्छा.