सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती जाधव दिसणार चाबी या शॉर्ट फिल्ममध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:09 IST2017-11-03T10:39:25+5:302017-11-03T16:09:25+5:30
सिद्धार्थ जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने आजवर जत्रा, दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, टाइम ...

सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती जाधव दिसणार चाबी या शॉर्ट फिल्ममध्ये
स द्धार्थ जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने आजवर जत्रा, दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, टाइम प्लीज यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सिद्धार्थने मराठी प्रमाणेच गोलमाल रिटर्न्स, गोलमाल फन अनलिमिटेड यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. तसेच कहानी कॉमेडी सर्कस की, कॉमेडी सर्कस के अजूबे यांसारख्या कार्यक्रमाद्वारे त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. सिद्धार्थने आजवर मिळवलेल्या या यशामागे त्याची मेहनत आहे.
सिद्धार्थ जाधव नुकताच नच बलिये या कार्यक्रमात त्याची पत्नी तृप्ती जाधवसोबत झळकला होता. तृप्ती आणि सिद्धार्थने या कार्यक्रमात खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्यांच्या सगळ्याच परफॉर्मन्सचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. सिद्धार्थ एक चांगला कलाकार असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण तृप्तीने देखील या कार्यक्रमाद्वारे ती एक चांगली कलाकार, डान्सर असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळेच तिला आता अभिनयाची ऑफर आली असून तिने ही ऑफर स्वीकारली देखील आहे.
तृप्ती कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत नव्हे तर ती एका शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार आहे. या शॉर्ट फिल्मचे नाव चाबी असे आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये चार व्यक्तिरेखा या महत्त्वाच्या असणार आहेत आणि या चार व्यक्तिरेखांपेक्षा एकाची भूमिका तृप्ती साकारणार आहे. ही एक हिंदी शॉर्ट फिल्म असून तृप्तीच्या करियरमधली ही पहिलीच शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी तृप्ती सध्या खूप उत्सुक आहे.
तृप्तीने कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिकांमध्ये अभिनय केला होता. पण नंतरच्या काळात ती नोकरी करत असल्याने तिला अभिनयासाठी वेळ देता आला नाही. आता १०-१२ वर्षांनंतर ती अभिनयक्षेत्राकडे वळली असून ती चाबी या शॉर्ट फिल्म मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तिला या शॉर्ट फिल्म बद्दल प्रितम यांनी नच बलियेच्या दरम्यान विचारले होते. तृप्तीला अनेक वर्षांनंतर अभिनय करण्याची संधी मिळत असल्याने तिने लगेचच या शॉर्ट फिल्मसाठी होकार दिला.
Also Read : सिद्धार्थ जाधव आणि त्याची लेक इराची जुगलबंदी पाहिलीत का?