“लग्नाआधी इंडस्ट्रीतल्या एका मुलीला डेट केलं होतं पण…”, त्या नात्याबद्दल स्पष्टच बोलला सिद्धार्थ चांदेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 11:52 IST2024-03-21T11:51:56+5:302024-03-21T11:52:17+5:30

Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये लग्नापूर्वी तो सिनेइंडस्ट्रीतील एका मुलीला डेट करत असल्याचे सांगितले.

Siddharth Chandekar, who was dating an actress before marriage, said - "I hate that breakup..." | “लग्नाआधी इंडस्ट्रीतल्या एका मुलीला डेट केलं होतं पण…”, त्या नात्याबद्दल स्पष्टच बोलला सिद्धार्थ चांदेकर

“लग्नाआधी इंडस्ट्रीतल्या एका मुलीला डेट केलं होतं पण…”, त्या नात्याबद्दल स्पष्टच बोलला सिद्धार्थ चांदेकर

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटचा तो श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात झळकला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत होती. सिद्धार्थ बऱ्याचदा त्याच्या बोल्ड आणि फॉर्वर्ड विचारांमुळे चर्चेत येत असतो. नुकतेच त्याने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत कलाविश्वातील त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या रिलेशनशीपवर भाष्य केले आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये लग्नापूर्वी तो सिनेइंडस्ट्रीतील एका मुलीला डेट करत असल्याचे सांगितले.तो म्हणाला की,हो मी सिनेइंडस्ट्रीतल्या एका मुलीला डेट केले आहे. म्हणजे मी तेव्हा इंडस्ट्रीत काम करत होतो तेव्हा मी तिला विचारले होते आणि आम्ही जेव्हा डेटींग सुरू केले त्यावेळी ती इंडस्ट्रीत नव्हती. 


तो पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा ती सिनेइंडस्ट्रीत आली. हा म्हणजे मग कलाविश्वातलीच झाली. म्हणून माझ्या अशा काही खूप साऱ्या गर्लफ्रेंड होत्या अशातला पण काही भाग नाहीये. कारण मी असा लॉन्ग टर्मवाला मॅन आहे. माझा लॉन्ग टर्म रिलेशनशिपवर विश्वास आहे. मला ना त्या ब्रेकअपचा खूप कंटाळा असतो. मला खूप कंटाळा येतो ते आता ब्रेकअप करा, मग नवीन कुणीतरी शोधा, मग काम कधी करायचं आपण? पर्सनल लाईफ जगायचं कधी? असं माझं कायम होत आलंय. त्यामुळे मी टिकवण्यावर भर देणारा मुलगा आहे.

Web Title: Siddharth Chandekar, who was dating an actress before marriage, said - "I hate that breakup..."