‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 14:14 IST2023-11-25T14:11:04+5:302023-11-25T14:14:47+5:30

झिम्माप्रमाणेच झिम्मा २ देखील बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसत आहे. 

Siddharth Chandekar marathi movie jhimma 2 first day box office collection | ‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, कमावले इतके कोटी

‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, कमावले इतके कोटी

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'झिम्मा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 'झिम्मा'नंतर या सिनेमाच्या सीक्वेलबाबत  प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता दोन वर्षांनी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.  नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  झिम्माप्रमाणेच झिम्मा २ देखील बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसत आहे. 

 ‘झिम्मा २’ चित्रपटात दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली.चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळत आहेत.  'झिम्मा २' प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. आता सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारीही समोर आली आहे.  

 लंडन टूरवर गेलेल्या स्त्रियांच्या गमतीजमती दाखवण्याऐवजी यात त्यांच्या आयुष्यातील प्रश्नांवर भाष्य करण्यात आलं आहे. सात जणींच्या जीवनातील दु:ख आणि त्यावर फुंकर मारण्याचा हा प्रयत्न आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार ‘झिम्मा २’ ने पहिल्या दिवशी १.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटाला महिला वर्गाचा विशेष प्रतिसाद मिळतोय आहे.
 

Web Title: Siddharth Chandekar marathi movie jhimma 2 first day box office collection