खुल्लमखुल्ला रोमांस करताना दिसले सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 12:07 IST2021-02-08T12:06:48+5:302021-02-08T12:07:56+5:30

लग्नानंतर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लोणावळा येथील एका रिसॉर्टमध्ये गेले होते. तिथले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Siddharth Chandekar and Mithali Mayekar were seen having an open romance, the photo went viral | खुल्लमखुल्ला रोमांस करताना दिसले सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर, फोटो झाले व्हायरल

खुल्लमखुल्ला रोमांस करताना दिसले सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर, फोटो झाले व्हायरल

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे नुकतेच पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले. या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर ते दोघे लोणावळा येथील मचान या रिसॉर्टला गेले होते. तिथले काही फोटो इंस्टाग्रामवर पहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत. 


टायनी पांडा ऑफिशिएल या इंस्टाग्राम पेजवर सिद्धार्थ आणि मितालीचे मचान येथील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत. 


एका फोटोत मिताली मयेकर बाथटबमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 


 तर दुसऱ्या फोटोत सिद्धार्थ आणि मिताली किस करताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूपच भावतो आहे.


पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता.


तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.


लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली होती.

Web Title: Siddharth Chandekar and Mithali Mayekar were seen having an open romance, the photo went viral