असं झालं सगळं...! सिद्धार्थ व मितालीने शेअर केला लग्नाचा व्हिडीओ, क्षणात झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 17:50 IST2021-01-31T17:50:00+5:302021-01-31T17:50:02+5:30

लेकीच्या लग्नात भावूक झाली मितालीची आई...

siddharth chandekar and mitali mayekar wedding video viral | असं झालं सगळं...! सिद्धार्थ व मितालीने शेअर केला लग्नाचा व्हिडीओ, क्षणात झाला व्हायरल

असं झालं सगळं...! सिद्धार्थ व मितालीने शेअर केला लग्नाचा व्हिडीओ, क्षणात झाला व्हायरल

ठळक मुद्देसिद्धार्थ व मितालीच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. अवघ्या 3 तासांत 78 हजारांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर गेल्या 24 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला.  लग्नाला आठवडा झाला आणि आता या निमित्ताने मिताली व सिद्धार्थ दोघांनीही आपल्या लग्नातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सौभाग्याची मंगलघटिका, या कॅप्शनसह मितालीने लग्नाचा अतिशय सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मिताली व सिद्धार्थने लग्नात केलेली मस्ती, एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर एकमेकांना मारलेली घट्ट मिठी ते लेकीच्या लग्नात भावूक झालेली आई, तिच्या डोळ्यातील अश्रू असे सगळे या व्हिडीओत आहे.  

सिद्धार्थ व मितालीच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. अवघ्या 3 तासांत 78 हजारांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सिद्धार्थनेही हा सेम व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘असं झालं सगळं’ असे हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे.

सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलारांनीदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.   लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान या रिसॉर्टला गेले आहेत. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.

Web Title: siddharth chandekar and mitali mayekar wedding video viral