विना मेकअप लूकमध्येही अभिनेत्री श्रुती मराठे दिसते तितकीच सुंदर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:23 IST2020-09-05T16:17:44+5:302020-09-05T16:23:04+5:30

श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत

Shruti Marathe's without makeup photo viral on internet | विना मेकअप लूकमध्येही अभिनेत्री श्रुती मराठे दिसते तितकीच सुंदर, फोटो व्हायरल

विना मेकअप लूकमध्येही अभिनेत्री श्रुती मराठे दिसते तितकीच सुंदर, फोटो व्हायरल

अभिनेत्री श्रुती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अलीकडेच तिने तिचा विना मेकअप लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यातील तिचा सिंपल लूक चाहत्यांना भावला.  विनामेकअप लूकमध्येही श्रुती तितकीच सुंदर दिसते. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली. 

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.
 

Web Title: Shruti Marathe's without makeup photo viral on internet