तुम्ही व्हाल घायाळ श्रृती मराठेचा फोटो पाहून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:36 IST2019-04-29T11:29:09+5:302019-04-29T11:36:08+5:30

अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

Shruti marathe traditional look viral on social media | तुम्ही व्हाल घायाळ श्रृती मराठेचा फोटो पाहून !

तुम्ही व्हाल घायाळ श्रृती मराठेचा फोटो पाहून !

ठळक मुद्दे श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत श्रृतीने आपल्या साडीमधला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. 


नुकताच श्रृतीने आपल्या साडीमधला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिचे सोज्वळ सौंदर्य रसिकांना घायाळ करते आहे. या फोटोतील तिचा सिंपल लूक तिच्या सौंदर्याला चार चांद लावतो आहे. श्रृतीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.   


मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रृतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.
श्रृतीला राणी मुखर्जीचा 'ब्लॅक' सिनेमातील भूमिका साकारण्याची इच्छा आहे. हा रोल श्रृतीचा ड्रीम रोल असल्याचे तिने सांगितले होते.

Web Title: Shruti marathe traditional look viral on social media