'मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी' म्हणत, श्रुती मराठेने शेअर केला ब्लॅक अँड व्हाईट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 13:30 IST2021-04-15T13:26:12+5:302021-04-15T13:30:37+5:30

श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.

Shruti marathe shared her black and white photo on internet | 'मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी' म्हणत, श्रुती मराठेने शेअर केला ब्लॅक अँड व्हाईट फोटो

'मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी' म्हणत, श्रुती मराठेने शेअर केला ब्लॅक अँड व्हाईट फोटो

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.


अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. श्रुतीने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी आँखों को ये हुनर कभी आया ही नहीं असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. श्रुतीचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटोतील अदा पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत. काही वेळातच तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे.

Web Title: Shruti marathe shared her black and white photo on internet