क्या खूब लगती हो बडी, सुंदर दिखती हो.., श्रुती मराठेचे हे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 17:02 IST2021-01-13T16:59:34+5:302021-01-13T17:02:52+5:30

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Shruti Marathe share her white colors dress photo on social media | क्या खूब लगती हो बडी, सुंदर दिखती हो.., श्रुती मराठेचे हे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल

क्या खूब लगती हो बडी, सुंदर दिखती हो.., श्रुती मराठेचे हे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अलीकडेच तिने तिचे व्हाईट डेसमधील  फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती खूपच सुंदर दिसते आहे. सिंपल लूक श्रुतीच्या सौंदर्याला चार चांद लावते आहे.  तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली. सेलिब्रेटींनीही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. 

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.
 

Web Title: Shruti Marathe share her white colors dress photo on social media