ओळखा पाहू या मराठमोळ्या अभिनेत्रीला, मराठीसह साऊथमध्ये ही आहे तिचे मोठं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 07:15 IST2019-12-24T07:15:00+5:302019-12-24T07:15:00+5:30

तिच्या या फोटोवर मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत.   

Shruti marathe share her childhood on instagram | ओळखा पाहू या मराठमोळ्या अभिनेत्रीला, मराठीसह साऊथमध्ये ही आहे तिचे मोठं नाव

ओळखा पाहू या मराठमोळ्या अभिनेत्रीला, मराठीसह साऊथमध्ये ही आहे तिचे मोठं नाव

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रुतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.


अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

नुकताचं श्रुतीने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. श्रुतीचा हा फोटो तिसरीत असतानाचा आहे असा उल्लेख तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये केला आहे. लहानपणीच्या फोटो श्रुती खूपच गोड दिसते आहे. श्रुतीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. इतकेच नाही तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार देखील कमेंट करताना दिसत आहे.   


श्रुतीचा मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.

Web Title: Shruti marathe share her childhood on instagram