काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रुती मराठे दिसतेय ग्लॅमरस, फोटोवर होतोय लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 16:48 IST2021-01-25T16:46:05+5:302021-01-25T16:48:18+5:30

श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते.

Shruti marathe looks glamorous in a black dress | काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रुती मराठे दिसतेय ग्लॅमरस, फोटोवर होतोय लाईक्सचा वर्षाव

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रुती मराठे दिसतेय ग्लॅमरस, फोटोवर होतोय लाईक्सचा वर्षाव

श्रुती मराठे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने साऊथ चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत. आपल्या अभिनयाने तिने साऊथच्या चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे.  तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.

 श्रुती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अलीकडेच तिने तिचे ब्लॅक ड्रेसमधले फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती ग्लॅमरस दिसतेय. काळा रंगाच्या ड्रेस श्रुती उठून दिसतो आहे.  तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली आहे. 
 

Web Title: Shruti marathe looks glamorous in a black dress