क्या अदा क्या जलवे तेरे पारो ! या मराठी अभिनेत्रीचे फोटोशूट पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 12:30 IST2021-03-04T07:00:00+5:302021-03-04T12:30:01+5:30

अलीकडेच तिने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Shruti marathe looks different in her latest photoshoot | क्या अदा क्या जलवे तेरे पारो ! या मराठी अभिनेत्रीचे फोटोशूट पाहून चाहते झाले घायाळ

क्या अदा क्या जलवे तेरे पारो ! या मराठी अभिनेत्रीचे फोटोशूट पाहून चाहते झाले घायाळ

श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अलीकडेच तिने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय. या फोटोमध्ये श्रुतीला ओळखंण देखील कठीण झालंय. तिचा हा नवा अवतार चाहत्यांसह सेलिब्रेटींनादेखील आवडला आहे. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.

श्रुती मराठे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने साऊथ चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत. आपल्या अभिनयाने तिने साऊथच्या चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.

Web Title: Shruti marathe looks different in her latest photoshoot