श्रुती मराठेचे बॉलीवुडमध्ये पदापर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 14:18 IST2016-06-23T08:48:10+5:302016-06-23T14:18:10+5:30

मराठी इंडस्ट्रीतील तगडया अभिनेत्री अमृता सुभाष, प्रार्थना बेहरे, तेजश्री प्रधान यांच्या पाठोपाठ आता श्रुती मराठे देखील बॉलीवुडमध्ये पदापर्ण करण्यास सज्ज झाली आहे. ती बुधिया सिंग-बॉर्न टू रन या बॉलिवुड चित्रपटात बॉलिवुडचा तगडा अभिनेता मनोज वाजपेयीसोबत झळकणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना श्रुती म्हणाली,

Shruti Marathe gets her Bollywood debut | श्रुती मराठेचे बॉलीवुडमध्ये पदापर्ण

श्रुती मराठेचे बॉलीवुडमध्ये पदापर्ण

ाठी इंडस्ट्रीतील तगडया अभिनेत्री अमृता सुभाष, प्रार्थना बेहरे, तेजश्री प्रधान यांच्या पाठोपाठ आता श्रुती मराठे देखील बॉलीवुडमध्ये पदापर्ण करण्यास सज्ज झाली आहे. ती बुधिया सिंग-बॉर्न टू रन या बॉलिवुड चित्रपटात बॉलिवुडचा तगडा अभिनेता मनोज वाजपेयीसोबत झळकणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना श्रुती म्हणाली, बुधिया सिंग या ५ वर्षाच्या मुलावर आधारित हा चित्रपट आहे. २००६ यावर्षी बुधिया खूप चर्चेत होता. कारण एवढया लहान वयात बुधिया ४८ मॅरेथॉन धावला होता. याच बुधियाच्या कोचची भूमिका मनोज वाजपेयीने केली आहे.तर त्यांच्या पत्नीची भूमिका गीता म्हणजेच मी केली आहे. तसेच मनोज वाजपेयी यांच्यासारख्या मोठया कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव खरचं खूप छान होता. एवढा मोठा नट समोर असतानादेखील त्याने ते जाणून दिले नाही हीच त्याची खासीयत आहे. आमचे खूप छान सीन आहेत ते तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतील.


Web Title: Shruti Marathe gets her Bollywood debut