श्रिया पिळगांवकरने लाडक्या आजोबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 11:13 AM2024-06-16T11:13:20+5:302024-06-16T11:13:36+5:30

श्रियाने सोशल मीडियावरुन आजोबांसाठी खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Shriya Pilgaonkar Shared Special Birthday Post To Wish Her Grandfather Arun Sabnis With Lovely Pictures | श्रिया पिळगांवकरने लाडक्या आजोबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल

श्रिया पिळगांवकरने लाडक्या आजोबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल

मराठीतील लोकप्रिय जोडी सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर यांची 'एकुलती एक' मुलगी श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) सध्या चर्चेत आहे. श्रिया पिळगावकरने (Shriya Pilgaonkar) नुकतेच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा आहे.  श्रियाने सोशल मीडियावरुन आजोबांसाठी खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रियानं आपले आजोबा अरुण सबनीस (Arun Sabnis) यांचा ८५ वा वाढदिवस अगदी खास केला.  शनिवारी तिने पोस्ट शेअर करत लिहलं, "माझे आजोबा ८५ वर्षांचे झाले आहेत. पण, याचवेळी ते १८ आणि ८ वर्षांचेदेखील आहेत. ते जिवनाचा पुरेपुर आनंद घेतात, यातूनच त्यांचं हृदय हे कायम जिवंत राहतं, त्याचे मन जिज्ञासू आणि साहस शोधणारं आहे. त्यांची नातं असणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि त्यांच्याबरोबर हे जीवन अनुभवणं हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्या अनेक प्रेरणादायी कथा मी नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवीन. आजोबांना आयुष्यातील आणखी काही साहसी वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा! वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आजोबा".

श्रियाच्या पोस्टवर अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनीदेखील कमेंट करत तिच्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अरुण सबनीस हे सुप्रिया पिळगावकर यांचे वडील आहेत. श्रिया कायम तिच्या आजोबांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावरून अभिनेत्रीचं तिच्या आजोबांवर किती प्रेम आहे हे लक्षात येतं. ८5 वर्षांचे अरुण सबनीस यांचे आतापर्यंत १०० देश फिरुन झाले आहेत. त्यांचं लहानपणापासूनचं जग बघायचं स्वप्न होतं, असं श्रियाने एकदा पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. 

श्रिया सध्या ओटीटी माध्यमात प्रचंड लोकप्रिय आहे.  तिच्या अनेक हिंदी वेब सीरिज ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये असतात. मिर्झापूर, द ब्रोकन, ताजा खबर अशा अनेक सीरिज मध्ये श्रिया झळकली. श्रिया मराठमोळी मुलगी असूनही तिने हिंदीमध्ये आपला डंका गाजवला आहे. श्रियाचा नुकताच ड्राय डे सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. यामध्ये तिने अभिनेता जितेंद्र कुमारसोबत स्क्रीन शेअर केली. श्रिया ओटीटी माध्यमात रुळली असली तरी तिला पुन्हा मराठीत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. श्रियाने 'एकुलती एक' या मराठी सिनेमातून पदार्पण केलं होतं. नंतर तिने शाहरुख खानच्या 'फॅन' सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. यानंतर श्रियाला हिंदी सीरिजच्या ऑफर्स मिळत गेल्या. 
 

Web Title: Shriya Pilgaonkar Shared Special Birthday Post To Wish Her Grandfather Arun Sabnis With Lovely Pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.