श्रेयस तळपदेचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 15:02 IST2024-04-08T15:00:43+5:302024-04-08T15:02:20+5:30

अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे.

Shreyas Talpade has a special bonding with daughetr adya wife shared father daughetr duo funny photo on social media | श्रेयस तळपदेचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

श्रेयस तळपदेचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे. श्रेयसला मोठ्या पडद्यावर पाहिलं की त्याची मेहनत आणि कामाप्रती त्याचं असणारं प्रेम दिसून येतं. श्रेयस त्याच्या कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी आपल्या कुटुंबामध्येही तो तितकाच रमलेला दिसतो. श्रेयस  त्याच्या कुटुंबासोबत बऱ्याचदा एकत्रित वेळ घालवताना दिसतो. त्याचे त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर आपण पाहतो. शातच श्रेयसच्या पत्नीने शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले.

श्रेयसच्या लेकीचं नाव आहे आद्या. श्रेयसची पत्नी दीप्तीने शेअर केलेल्या फोटोवरून श्रेयस आणि त्याची लेक आद्या यांच्यातील खास बॉण्डिंग पाहायला मिळतंय. आद्याने श्रेयसच्या केसांना तिचे क्लिप्स लावलेले दिसून येत आहेत. हे हेअर क्लिप्स पाहून श्रेयस आद्याबरोबर वेळ घालवताना दिसतोय. श्रेयसचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. याआधी श्रेयस त्याच्या लाडक्या लेकीसोबत रंगपंचमीचं खास सेलिब्रेशन करताना दिसून आला. 


काही दिवसांपूर्वीच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. नेहमी फिट असणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पण, यातून सुदैवाने श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसने हा त्याचा पूर्णजन्मच असल्याचं सांगितलं होतं. या संकटात श्रेयसची पत्नी त्याच्याबरोबर होती आणि तिने त्याला यातून बाहेर काढलं. हार्ट अटॅकवर मात केल्यावर श्रेयस 'वेलकम टू जंगल'  सिनेमाचं शुटींग करत आहे.

Web Title: Shreyas Talpade has a special bonding with daughetr adya wife shared father daughetr duo funny photo on social media