श्रेया बुगडेने 'या' कारणासाठी मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 16:45 IST2019-05-18T16:41:26+5:302019-05-18T16:45:27+5:30

नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून विविध भूमिका साकारुन श्रेया बुगडे रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.

shreya bugde fan following on instagram crossed six lakhs followers | श्रेया बुगडेने 'या' कारणासाठी मानले चाहत्यांचे आभार

श्रेया बुगडेने 'या' कारणासाठी मानले चाहत्यांचे आभार

ठळक मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतेश्रेयाच्या इन्स्टाग्रामवरील फोलॉवर्सची संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे

नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून विविध भूमिका साकारुन श्रेया बुगडे रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.  सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच श्रेयने एक फोटो शेअर करुन आपल्या फॅन्सचे आभार मानले आहेत. त्याला कारण ही तसेच आहे. श्रेयाच्या इन्स्टाग्रामवरील फोलॉवर्सची संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. याबाबत श्रेयाने सर्व फॅन्सचे आभार मानले  आहेत. 


 ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील विनोदवीरांसोबतच कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.


श्रेयाने वयाच्या ८व्या वर्षी बालनाटयात काम केलं होते. शाळा-कॉलेजातून तिने अनेक कलाप्रकारांमध्ये काम करायला सुरूवात केली.  तू तिथे मी या मालिकेपासून तिचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला. तिला अनेकवेळा विनोदी मालिकेच्या ऑफर आल्या. तिने सुरुवातीला नकार दिला  पण तिने प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वी झाली.

Web Title: shreya bugde fan following on instagram crossed six lakhs followers