Prajakta Mali: त्याला भेटायचच होतं..., राज ठाकरेंच्या नातवाला खेळवताना दिसली प्राजक्ता माळी, शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 14:59 IST2022-10-23T14:56:50+5:302022-10-23T14:59:26+5:30
Prajakta Mali, MNS Deepotsav : प्राजक्ताने 'शिवतीर्थ'वरचे खास फोटो शेअर केले आहेत. यातला एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. होय, या फोटोत प्राजक्ता राज ठाकरे यांच्या नातवाला खेळवताना दिसतेय.

Prajakta Mali: त्याला भेटायचच होतं..., राज ठाकरेंच्या नातवाला खेळवताना दिसली प्राजक्ता माळी, शेअर केले खास फोटो
दादरमधील शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने दीपोत्सवाचं (MNS Deepotsav) आयोजन करण्यात आलंय. शिवाजी पार्क परिसर उजळून निघाला आहे. अनेक दिग्गज मराठी कलाकारांना मनसेच्यावतीनं दीपोत्सवाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर ‘शिवतीर्थ’वर त्यांचा पाहूणचारही करण्यात आला. अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सुद्धा यावेळी हजर होती. प्राजक्ताने याचे खास फोटो शेअर केले आहेत. यातला एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. होय, या फोटोत प्राजक्ता राज ठाकरे यांच्या नातवाला खेळवताना दिसतेय.
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाच्या निमित्ताने पदरात पडलेले काही क्षण...,’ असं लिहित प्राजूने हे फोटो शेअर केले आहेत. शिवाय राज ठाकरे यांचे आभारही मानले आहेत.
दीपोत्सवाच्या आमंत्रणासाठी, अतिशय प्रेमानं केलेल्या पाहूणचारासाठी खूप धन्यवाद, मा. श्री. राजसाहेब ठाकरे... अतिशय गोड अशा शर्मिला ताई ... दीपोत्सव बघून इतकी भारावून गेले की फोटो काढायचे विसरले... त्यामुळे नेमके ते फोटो नाहीत... असो.. पण किआनबरोबर फोटो काढला...(त्याला भेटायचच होतं...,) असं प्राजक्ताने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
प्राजूच्या या पोस्ट आणि फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने तिला मनसेत सामील होण्याचा सल्ला दिला आहे. प्राजू, मला तुम्हाला राजकारणात पाहण्याची इच्छा आहे. कृपया मनसेमध्ये सामील व्हा आणि राज साहेबांप्रमाणे मराठी लोकांसाठी आणि चित्रपटांच्या भल्यासाठी काम करा...तुझ्यावर प्रेम आहे, असं एका चाहत्याने तिच्या या पोस्टवर लिहिलं आहे. कसं वाटलं मग पार्कात येऊन..., असा सवाल एका चाहत्याने तिला यानिमित्ताने केला आहे.
मनसेच्या दीपोत्सवात प्राजक्तासह मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, संतोष जुवेकर, विशाखा सुभेदार, संजय नार्वेकर, वंदना गुप्ते आदींनी हजेरी लावली होती.