'देखते ही मुझको तुझसे प्यार हो गया...'; शिव ठाकरेने शेअर केला खास व्यक्तीसोबचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 04:57 PM2023-11-22T16:57:14+5:302023-11-22T17:14:00+5:30

शिव ठाकरे त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या हळव्या स्वभावामुळेही ओळखला जातो.

Shiv Thackeray shared a video of Grandmother | 'देखते ही मुझको तुझसे प्यार हो गया...'; शिव ठाकरेने शेअर केला खास व्यक्तीसोबचा व्हिडीओ

'देखते ही मुझको तुझसे प्यार हो गया...'; शिव ठाकरेने शेअर केला खास व्यक्तीसोबचा व्हिडीओ

आपला हक्काचा माणूस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठी 2 चा विजेता ठरलेला शिव आज मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात तो पोहोचला आहे. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या हळव्या स्वभावामुळेही ओळखला जातो. शिव ठाकरेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या शिवच्या अशाच एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तो गाडीत बसलेला असून त्याची आजी त्याच्यासोबत दिसत आहे. या व्हिडीओला त्याने 'देखते ही मुझको तुझसे प्यार हो गया' हे गाणे जोडले आहे. शिवने शेअर केलेला हा व्हिडिओ फारच सुंदर आहे. व्हिडिओ पाहून शिवचे चाहते भावुकही झाले आहेत. 

काही दिवसांपुर्वी शिवने आपल्या आजीचा 82 वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता. तेव्हाही चाहत्यांनी शिवचं कौतुक केलं होतं. शिव अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्यामुळे त्याने त्याच्यातला साधेपणा आजही जपून ठेवला आहे. त्याच्या स्वभावातील याच साधेपणामुळे आणि चाहत्यांशी प्रेमाने वागण्याच्या सवयीमुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.

 शिवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 'बिग बॉस सीझन 16', 'खतरों के खिलाडी सीझन 13' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो 'झलक दिखला जा सीझन 11' मध्ये पाहायला मिळणार आहे. 'झलक दिखला जा सीझन 11' हा शिव ठाकरेचा वर्षातील तिसरा रिअ‍ॅलिटी शो असणार आहे. त्याला पडद्यावर नाचताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड भेट ठरणार आहे.

Web Title: Shiv Thackeray shared a video of Grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.