"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:11 IST2025-06-27T18:11:13+5:302025-06-27T18:11:45+5:30
Neha Shitole : नेहा शितोळेने नुकतेच एका मुलाखतीत राज्यातील हुंडाबळी प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं.

"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
नेहा शितोळे (Neha Shitole) मराठी कलाविश्वाील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम लेखिका सुद्धा आहे. त्याने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मराठी मालिका, आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने साकारलेल्या खलनायिकांच्या भूमिका विशेष गाजल्या. सध्या नेहा शितोळे अशोक मा.मा. या मालिकेत काम करताना दिसत आहे. दरम्यान एका मुलाखतीत हुंडाबळी प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
नेहा शितोळेने नुकतेच सुमन म्युझिक युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील हुंडाबळीवर आपलं मत व्यक्त केलं. तिने म्हटले की, ''मला असं वाटतं की पहिल्यांदा जेव्हा तुमच्या मुलीच्या अंगावर तुम्हाला व्रण दिसतात, काळे निळे किंवा ती मार खाते आहे हे कळतं तुम्हाला किंवा घरी येऊन ती रडते तुमच्या समोर आणि मुळात पहिल्यांदा जेव्हा तुमची मुलगी मार खाऊन घरी येते तेव्हा तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे ना तेव्हा मग तुमच्यातलं उसळतं रक्त बिक्त कुठे जातं म्हणजे ज्या पद्धतीचा इतिहास आपण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो. ज्यांनी कायम स्त्रियांना मानाची वागणूक देण्याचीच शिकवण आपल्याला आतापर्यंत दिलेली आहे.''
''आपल्याला मुलीचं रक्षण करायला शिकवलंय''
''आपल्याकडे परंपरा आहे की नाही एकदा मुलगी दिली की ती परक्याचं धन वगैरे पण दुसरीही एक परंपरा आहे ना ज्याने आपल्याला मुलीचं रक्षण करायला शिकवलंय. आपल्या मुलीला पाठीशी उभं राहायला शिकवलंय. हंबीरराव मोहित्यांसारखा माणूस आहे ज्यानी लहानपणापासून आपल्या मुलीला शस्त्रविद्येचं शिक्षण दिलं आणि तिला एबल बनवलं की नंतर ती स्वराज्याचा सांभाळ करू शकेल,'' असे नेहा शितोळेने म्हटले.