शशांक मारतोय मिसळवर ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 18:26 IST2016-09-07T12:56:20+5:302016-09-07T18:26:20+5:30

               शशांक केतकरने अल्पावधीतच आपल्या अभिनयशैलीने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शशांक विषयी ...

Shashank Matthoy's proposal | शशांक मारतोय मिसळवर ताव

शशांक मारतोय मिसळवर ताव

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
             शशांक केतकरने अल्पावधीतच आपल्या अभिनयशैलीने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शशांक विषयी अनेक गोष्टी जाणून घ्यायला त्याचे चाहते देखील नेहमीच आतूर असतात. आपल्या आवडत्या कलाकाराला खायला काय आवडते याची तर उत्सुकता प्रत्येक कलाकाराच्या चाहत्यांना लागलेली असते. आता शशांकचेच पाहा ना, शशांकला म्हणे मिसळ पाव खायला फार आवडतो. आणि मिसळ खायचे त्याचे प्लॅनिंग सुद्धा ठरलेले असते. तुम्ही म्हणाल की मिसळ खायला कसले आले प्लॅनिंग. तर खरे म्हणजे शशांक मिसळवाप वर ताव मारतो पण गणपती बाप्पाच्या विसर्जनानंर. अहो असे आम्ही सांगत नाही तर शशांकनेच असे सांगितले आहे. शशांकच्या घरी अनेक वर्षांपासून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. ज्यावेळी गणेश विसर्जन केले जाते. त्यानंतर शशांकच्या कुटूंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन मस्तपैकी मिसळ पाववर  तुटून पडतात. 

Web Title: Shashank Matthoy's proposal