पाहा... चिराग पाटीलचे आवडते दिग्दर्शक कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 15:41 IST2017-02-04T10:11:22+5:302017-02-04T15:41:22+5:30
बॉलिवुड असो या मराठी कलाकार प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची तीव्र इच्छा असते. त्याचबरोबर त्या कलाकाराची आवड जाणून ...
.jpg)
पाहा... चिराग पाटीलचे आवडते दिग्दर्शक कोण?
ॉलिवुड असो या मराठी कलाकार प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची तीव्र इच्छा असते. त्याचबरोबर त्या कलाकाराची आवड जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यासाठी ती व्यक्ती धडपड करतानादेखील पाहायला मिळत असते. मात्र आपल्या आवडत्या कलाकाराची आवड जाणून घेण्यासाठी सोशलमीडिया हे अधिक सोईस्कर माध्यम झाले आहे. आता हेच पाहा ना, नुकतेच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता चिराग पाटील याने सोशलमीडियावर आपल्या चाहत्यांसोबत लाइव्ह चाट केले आहे. या चाटमध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. यावर चिरागने आपले चाहत्यांना निराश न करता अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिले.
चिराग या लाइव्ह संवादमध्ये आवडता मित्र, दिग्दर्शक, नवीन प्रोजेक्ट असे अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबर तुझा व्हॅलेनटाइन डेचा प्लॅन काय आहे असे प्रश्न विचारतदेखील त्याची गोची केली असल्याचे पाहायला मिळाले. तसेच तुझे वडील संदीप पाटील एक मोठे क्रिकेटर आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल न टाकता या क्षेत्राकडे कसा वळालास असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित केले.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाºया या अभिनेत्याने कोणताही आडाविडा न घेता सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. मला अभिनयाची आवड लहानपणापासून असल्याने या क्षेत्राकडे वळलो आहे. तसेच नुकतेच दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्यासोबत वजनदार हा चित्रपट केला आहे. या चित्रपटावेळी या दिग्दर्शकाने मला खूप छान मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हा दिग्दर्शक माझा आवडता दिग्दर्शक असल्याचे त्याने सांगितले. तर अभिनेत्री सई ताम्हणकर ही माझी फेव्हरेट अभिनेत्री आहे. व्हॅलेनटाइन डेला मी चित्रिकरणामध्ये व्यग्र असल्याचे त्याने सांगितले.