पाहा सुबोधला कोणता प्रश्न पडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 14:23 IST2016-12-09T14:23:32+5:302016-12-09T14:23:32+5:30

प्रत्येक व्यक्ती हा कामाच्या धावपळीत अडकला आहे. त्यामुळे त्याला स्वत:साठी वेळ काढणे फार कठीण झाले आहे. असेच काहीशी अवस्था ...

See, what question did Subodh fall? | पाहा सुबोधला कोणता प्रश्न पडला?

पाहा सुबोधला कोणता प्रश्न पडला?

रत्येक व्यक्ती हा कामाच्या धावपळीत अडकला आहे. त्यामुळे त्याला स्वत:साठी वेळ काढणे फार कठीण झाले आहे. असेच काहीशी अवस्था कलाकारांचीदेखील होत असते. त्यांना अ‍ॅक्शन, सीन, रिटेक, लाईट अशा चंदेरी दुनियेत वेळ मिळणे फार अवघड असते. मात्र ज्यावेळी त्यांना वेळ मिळतो. त्यावेळीदेखील ते काहीसे प्रश्नात अडकलेले पाहायला मिळत असतात. असाच काहीसा प्रश्न प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे याला पडलेला आहे. तो ही चक्क गाडी चालविताना. आता हेच पाहा ना, सुबोधने सोशलमीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर त्याने फोटोसोबत एक पोस्टदेखील शेअर केली आहे. सुबोध आपल्या पोस्टच्या माध्यमातून विचारतो की, विचार आणि कृती यामध्ये नेमके अंतर किती. त्याच्या या प्रश्नांवर अनेक चाहत्यांनी प्रतिउत्तर पण दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या काही चाहत्यांनी काहीसे गंमतीदार उत्तरदेखील दिले आहे. तर काही म्हणतात, ठरविले शुन्य.. नाहीतर खूपच. तसेच सुबोधचा हा प्रश्न त्याच्या चाहत्यांनादेखील विचारात टाकणारा ठरला आहे, त्याचप्रमाणे त्याच्या या विचाराला काहींजणांनी दुजोरा दिला आहे. सुबोध सध्या फुगे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीदेखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची सध्या चर्चा रंगली आहे. तसेच सोशलमीडियावरदेखील या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सर्वच कलाकार लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक कलाकार फुगे हातात घेऊन चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. तसेच सुबोधने नाटक, मालिका आणि चित्रपटांतून  आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

Web Title: See, what question did Subodh fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.