पाहा : ह्रदयस्पर्शी ‘गणवेश’चा टिझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 19:30 IST2016-04-28T14:00:27+5:302016-04-28T19:30:27+5:30

विजयाते एन्टरटेन्मेन्ट प्रेझेन्ट ‘गणवेश’ या सिनेमाचं नुकतच टिझर रिलीज झालय. सुप्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे या चित्रपटाद्वारे दिग्दशर्नान पदार्पन करीत आहेत...

See: Tissue of the heartfelt 'uniform' | पाहा : ह्रदयस्पर्शी ‘गणवेश’चा टिझर

पाहा : ह्रदयस्पर्शी ‘गणवेश’चा टिझर

जयाते एन्टरटेन्मेन्ट प्रेझेन्ट ‘गणवेश’ या सिनेमाचं नुकतच टिझर रिलीज झालय. सुप्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे या चित्रपटाद्वारे दिग्दशर्नान पदार्पन करीत आहेत. या सिनेमात एका विटभट्टी कामगार जोडप्याची आणि त्यांच्या मुलाभोवतीची कथा गुंफण्यात आली आहे. १५ आॅगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य ह्या विषयावर आधारित भाषण करण्यासाठी त्याच्या मुलाची निवड होते. पण त्यासाठी ‘गणवेश’ आवश्यक असतो. या गणवेश मागे नेमकी कोणती कथा उलगडते हे रंजक पद्धतीने सिनेमात पाहायला मिळेल. 


‘गणवेश’ ही एका जिद्दीची कहाणी आहे. अभिनेते किशोर कदम, अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्मिता तांबे, दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात असून त्याच्यासोबतच बालकलाकार तन्मय मांडे प्रमुख भूमिकेत आहे. गणवेश येत्या २४ जूनला संपूर्ण महाराष्टÑात प्रदर्शित होत आहे.  

Web Title: See: Tissue of the heartfelt 'uniform'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.