फोटोतील चिमुकल्याची तुफान क्रेझ, मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत उमटला अभिनयाचा ठसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 15:17 IST2023-12-22T15:10:34+5:302023-12-22T15:17:22+5:30

या चिमुकल्याने मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केले असून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. 

See These Adorable Childhood Pics Of Amey Wagh | फोटोतील चिमुकल्याची तुफान क्रेझ, मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत उमटला अभिनयाचा ठसा!

फोटोतील चिमुकल्याची तुफान क्रेझ, मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत उमटला अभिनयाचा ठसा!

फोटोत दिसणाऱ्या या हसऱ्या चेहऱ्याने फक्त मराठीत नाही तर हिंदी इंडस्ट्रीत कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. आज हा चिमुकला सुपरस्टार आहे. त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. या चिमुकल्याने मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केले असून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. 

फोटोत दिसणारा हा चिमुकला अभिनेते अमेय वाघ आहे. देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी तो एक आहे. अभिनेता अमेय वाघने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करीत चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच त्याचा बालपणीचा फोटो व्हायरल झाला आहे. 

तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या अमेय वाघने नाटक, मालिका आणि अनेक सिनेमांमध्ये काम केले. अमेय 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचला. 'फास्टर फेणे', 'मी वसंतराव', 'गर्लफ्रेंड', 'मुरांबा', 'झोंबिवली', 'धुरळा', 'गर्लफ्रेंड', 'अनन्या', 'जग्गू आणि ज्युलिएट' या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या असूर या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वात अमेय दिसला होता. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. असूरनंतर अमेय नेटफ्लिक्सच्या  'काला पानी' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या वेब सीरिजमध्ये अमेय पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. शिवाय, 'द ग्रेट इंडियन मर्डर', 'कारटेल' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

Web Title: See These Adorable Childhood Pics Of Amey Wagh