स्टनिंग फोटो शेअर करत मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने मानले चाहत्यांचे आभार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 07:00 IST2021-02-02T07:00:00+5:302021-02-02T07:00:02+5:30

सायली सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

Saylee Sanjeev thanked fans for washing on her birthday | स्टनिंग फोटो शेअर करत मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने मानले चाहत्यांचे आभार !

स्टनिंग फोटो शेअर करत मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने मानले चाहत्यांचे आभार !

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. या मालिकेनंतर सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती.

सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. सायलीला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. सायलीने तिच्या एक स्टनिंग फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. अलीकडे सायलीचा वाढदिवस झाला. तिने वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. सायलाने शेअर केलेल्या फोटोत ती फारच सुंदर दिसतेय.

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर लवकरच सायलीचा 'बस्ता' सिनेमा ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सायली संजीवने यामध्ये ‘स्वाती’ नावाची भूमिका केली आहे. 
 

Web Title: Saylee Sanjeev thanked fans for washing on her birthday